ब्रेकिंग न्यूज
Ganpatipule: पर्यटकांसाठी खूशखबर! गणपतीपुळे समुद्रकिनारा अखेर खुला, पण… IND vs SL : ‘गंभीर काय कामाचा नाही, बारक्या टीमला हरवून खुश होतो’, टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरचा जोरदा… सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ITBP जवान निकेश पुनवटकर यांचे आकापुरात भव्य स्वागत खापरी येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू CRIME : आई अचानक गायब, पोलिसात तक्रार! 1967 किमीचा प्रवास अन् ‘तमिलनाडू एक्सप्रेस’मध्ये धड नसलेली बॉडी, CCT… मारेगाव तालुक्यातील पांडव देवी येथे कावड यात्रा दाखल Satara News |कोयना धरणात पाणीसाठ्याची सेंच्युरी!, Shambhuraj Desai यांच्या हस्ते जलपूजन आयफोन नाही तर वेगळंच कारण, कुणालची मावशी पहिल्यांदाच समोर, रडत रडत सांगितलं… Video शेतकऱ्यांनो, खरीप हंगामासाठी करा लवकरात लवकर डिजिटल पीक नोंदणी, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्तीचा जागर!
SP News Maregaon

महाराष्ट्रातला माउंटन मॅन! रस्त्याअभावी रुग्णवाहिका उशिरा पोहोचली, गर्भवती पत्नीचा मृत्यू, पतीनं कुदळ-फावडं…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर: भारतीय स्वातंत्र्याला 79 वर्षे झाली, मात्र अजूनही काही दुर्गम भागात नागरिकांना रस्ता, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांसाठी कसरत करावी लागते. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर घोडनकण्णी हे असंच दुर्गम गाव आहे. या गावाला जोडणारा एकही पक्का रस्ता नाही. त्यामुळे रुग्णालयात जाण्यास विलंब झाला आणि एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला. पण पतीनं खचून न जाता हातात कुदळ आणि फावडं घेतलं. एकट्यानं सुरू केलेल्या कामाला गावकऱ्यांचे हात लागले आणि गावासाठी रस्ता तयार झाला. हा ध्येयवेडा व्यक्त म्हणजे तुळशीराम गेडाम होय. त्यांच्याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

बिहारमधील ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी अनेकांना माहिती असतील. डोंगर पोकरून त्यांन गावासाठी रस्ता बनवला. अशीच काहीशी कहाणी महाराष्ट्रातील माउंटन मॅनची देखील आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकण्णी येथील तुळशीराम गेडाम यांची पत्नी संगीता गरोदर होत्या. 14 जून 2026 रोजी गर्भवती असणाऱ्या पत्नी संगिता यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. वेदनांनी विव्हळत असतानाच तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही आणि घात झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने संगीता यांना जीव गमवावा लागला.

वर्षभर विचार, पुण्यातील तरुणाने Excel मध्ये शोधला जीवनसाथी, 53 स्थळांनंतर ठरला विवाह, Video

पत्नीच्या मृत्यूनंतर निर्णय घेतला

पत्नीच्या मृत्यूनंतर तुळशीराम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, आपल्यावर जी वेळ आली ती गावातील इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी निर्णय घेतला. हातात कुदळ आणि फावडं घेऊन त्यांनी थेट रस्ता बनवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केलं आणि रस्त्याचं आणि सामूहिक श्रमाचं महत्त्व पटवून दिलं. तुळशीराम यांच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आणि गावकऱ्यांनीही कुदळ, फावडं हाती घेण्याचा निर्णय घेतला.

आदिवासी दिनी श्रमदानाला सुरुवात

जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने गावकऱ्यांनी श्रमदानाला सुरुवात केली. बघता बघता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला. हा रस्ता उभारण्यासाठी तुळशीराम यांच्यासोबत गावातली 20 कुटुंबे एकत्र आली. त्यामुळे गावासाठी रस्ता तयार झाला आहे. आधी कुणी आजारी पडलं तर त्याला झोळीतून रुग्णालयापर्यंत न्यावं लागायचं. मात्र आता रस्ता असल्याने बैलगाडी किंवा इतर वाहनाच्या मदतीने रुग्णालय गाठता येईल. विशेष म्हणजे आता प्रशासनालाही जाग आली असून सिमेंट रस्त्याचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर