ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आणि खासगी क्लासेसलाही उद्या सु्ट्टी, कलेक्टर मॅडमचा आदेश

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलली असून जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांना सुट्टी घोषित केली आहे. स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्या आणि परवा असे सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा म्हणजेच ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे सखल भागात पाणी साचणे तसेच जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसामुळे शाळा, कॉलेज आणि क्लासेसला सुट्टी
या मुसळधार पावसाची शक्यता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेसला उद्या सुट्टी जाहीर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. संभाव्य धोका टळावा आणि विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सावधगिरी बाळगा, प्रशासनाकडून आवाहन
पावसाचा तीव्र इशारा पाहता जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिमहत्त्वाचे काम नसताना नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच नदी-नाले किंवा सखल भागांजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर