ब्रेकिंग न्यूज
Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला! 2 लाख खर्च केला अन् पांढऱ्या सोन्याची झाली माती, बीडच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी VIDEO पिंपरी-चिंचवडकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? सविस्तर Pakistan Cricket : 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ! 7 खेळाडूंची हकालपट्टी केल्यानंतर सिलेक्टरचा रा… पावसाने वाढवली चिंता, फुलोऱ्यातच सोयाबीनची फुलगळ आणि पानगळ, शेतकऱ्याचा खर्चही निघणं अवघड पुजेला अजून सामान लागेल, नवऱ्याला घराबाहेर पाठवलं, भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पुजेला अजून सामान लागेल, नवऱ्याला घराबाहेर पाठवलं, भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार, चंद्रपूर हादरलं

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाखाली एका २७ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिसी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत भोंदू महाराजासह त्याला मदत करणाऱ्या एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

शुभम खंगार असे अत्याचार करणाऱ्या मुख्य भोंदू महाराजाचे नाव असून, त्याला या कृत्यात साथ देणारे सचिन मोडक आणि तेजस वालकटे या दोघांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
पूजेच्या बहाण्याने पतीला पाठवले बाहेर
पीडित २७ वर्षीय महिलेच्या पतीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून सतत बिघडत होती. यावर उपाय म्हणून कुटुंबीयांनी गावातील शुभम महाराज याच्याशी संपर्क साधला होता. त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी शुभम महाराजाने घरात ‘ग्रहशांती’ आणि ‘कालसर्पदोष निवारण’ पूजा करण्याचे सुचवले.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या घरात पूजेची तयारी करून विधी सुरू करण्यात आला. पूजा अंतिम टप्प्यात असताना भोंदू महाराज आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून पीडितेच्या पतीला पूजेचे उर्वरित साहित्य आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवून दिले. पती घराबाहेर पडताच, असहाय्यतेचा फायदा घेत भोंदू महाराज शुभम याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारात सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांनी त्याला मदत केली.
भिसी पोलिसांकडून तिघांनाही अटक
पती घरी परतल्यानंतर आणि आरोपी निघून गेल्यानंतर घाबरलेल्या पीडितेने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेने तत्काळ भिसी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद केली आणि शोधमोहीम राबवून भोंदू महाराज शुभम खंगार, सचिन मोडक आणि तेजस वालकटे या तिघांनाही अटक केली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर