तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी हे तालुक्याचे मुख्यालय असुन मुख्यालयाच्या सुविधा इतरत्र नेत असतांना तालुक्याचा विकास रखडला आहे . झरी जामणी तालुका हा आदिवासी बहुत असल्याने या तालुक्याचा विकास करण्या ऐवजी इथल्या सुविधा इतरत्र नेवून तालुक्याला विकासापासून कोसो दूर नेण्याचा प्रयत्न केला जात असल्यचा आरोप जंगोम दल चे अध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक कालिदास अर्के यांनी केला आहे.
झरी या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण करण्यात येणारे क्रिडा संकुल पाटण या ठिकाणी बांधधकाम करण्याचा घाट घातला जात आहे.झरी हे मुख्यालय असून सुविधा पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे . त्यामुळे पाटण येथे निर्माण करण्यात येणारे क्रीडा संकुल रद्द करून झरी या मुख्यालयाच्या ठिकाणी बनविण्यात यावे.

अशी मागणी तहशीलदार झरी यांना निवेदनातून अर्के यांनी केली असुन वेळ आल्यास आमरण उपोषण करण्याचा .इशारा देण्यात आला आहे .