शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
1828

साखरा येथील घटना

सततच्या आत्महत्येने समाजमन सुन्न

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या साखरा येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्यांनी गावठाणा शिवारात असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 27 जुन 2025 रोज शुक्रवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

बबन जोगिराम परचाके वय 40 वर्ष रा.साखरा ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बबन हे स्वताची व मक्त्याची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांनी या वर्षी केलेल्या शेतामध्ये डबल पीक पेरणी झाल्याने ते नेहमी चिंतेत राहत असल्यामुळे त्यांनी साखरा येथील गावठाणा शिवारात पळसाच्या झाडाला नायलोन दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बबनने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट नाही.त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. बबनच्या पश्चात पत्नी,दोन मुल असा आप्त परिवार आहे. बबनच्या आत्महत्येचा पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांचे मार्गदर्शनात दत्ता किनाके करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here