कार्यक्रमास कलावंत प्रबोधनकार पथनाट्यकार,एकल संघटीत कलावंतची हजेरी
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी :- अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती तालूका शाखा झरी जामणी च्या विद्यमाने आणि मार्की येथील गूरूदेव सेवा मंडळाच्या सहभागातून दि.२६ जून रोजी मार्की (बू) येथील गंगा माता मंदिरा च्या सभागृहात कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदेचा सोहळा संपन्न झाला .
राष्ट्रसंतांच्या विचारानी व प्रेरणेनी प्रभावीत ३० अतिदूर्गम गावखेड्यातून जमलेल्या ७० भजन गायन मंडळाच्या महीला व पूरूष कलावंतांनी दमदार भजन गायन सादर केलीत.ह्या प्रसंगी ऊपस्थित भजन गायन मंडळीचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी कलावंतांना संबोधीत करतांना अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्याची माहीती दिली.तालूकाध्यक्ष हरिश्चंद्रजी बल्की पाटील,तालूका सचीव शंकरराव बावने,मोरेश्वर ऊदकवार तळागाळातील प्रत्येक कलावंतापर्यत पोहचण्याचे ऊद्दिष्ट्य असुन असल्याने जि.प./पं.स.सर्कल निहाय कलावंत आयोजन करण्यात येणार आहे.
कलावंत संगठन मजबूत करण्याचे कार्य जोमाने सूरू करण्यात येत आहे,कलावंतांचे प्रश्न अधिक ताकदीने सोडविणे प्रलंबीत प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड ह्याचे समर्थ नेतृत्वात जिल्हाकचेरीवर एक लाख कलावंतांचा आक्रोश मोर्चा लवकरच आयोजीत करणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,राळेगाव तालूकाध्यक्ष व गूरूदेव सेवा समिती गूरूकूंज मोझरी चे जिवन प्रचारक गंगाधरजी घोटेकर,वणी तालूकाध्यक्ष चंपतराव पाचभाई,राळेगाव तालूक्याचे प्रभावी सामाजिक कार्यकर्ते व गूरूदेव सेवा मंडळ वडकी चे अध्यक्ष बंडूभाऊ ऊताणे,विठ्ठलरावजी काकडे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास संरपंच दिवाकर उइके,उपसरपंच गजानन मिलमिले , पो.पा.अनुसया धुर्वे व्यास पिठावर उपस्थित होते .
यशस्वितेसाठी मार्की येथील महीला व पूरूष भजन मंडळाचे कलावंतांनी विशेषतः सूरेशराव बल्की ,आनंदराव हजारी, गजानन पोलचट्टीवार,सूरेश हजारे ,श्रावण बर्लावार,सतीश टोंगे,प्रदीप पिंपळकर,पांडूरंग पोलचेट्टीवार ,भोलानाथ राऊत,गजानन पानगंटीवार यांनी परिश्रम घेतले कलावंत,वारकरी,प्रबोधनकार
,पथनाट्यकार,एकल व संघटीत कलावंत मंडळी कार्यक्रमाला एकवटली होती.
