मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटतांना बापावर काळाचा घाला.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- शासकीय आश्रम शाळेत बोथ बहात्तर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झालीची माहिती आहे .मृतक शांताराम हिरामन तलांडे वय ५८ रा खडकडोह ता. झरी जामणी पो स्टे मुकुटबन यांचा काल दी १७/०६/०२२ ला सायंकाळी ६.०० वाजता निमनी मार्गे पांढरकवडा येथे जात असतांना अचानक राणटी जणावराने (रोह्याने ) गाडीला धडक दिल्याने शांताराम त्यांचा जागीच म्रुत्यु झाला आहे.
त्यांना पो स्टे मुकुटबन कर्मचारी यांनी त्याचा म्रुत देह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे रात्री १०.०० वा. दाखल करण्यात आले. शांताराम हे शासकीय आश्रम शाळा बोथ बहात्तर (पांढरकवडा) येथे कामाठी या पदावर होते विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचे पुढल्या महिन्याच्या ८ तारखेला लग्न आहे आणि लग्णाच्या पत्रीका वाटण्या साठी ते बाहेर गावी गेले होते.

त्यांच्या या जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना बापावर काळाचा घाला झाला आहे. आज खडकडोह येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .