मांगरूळ जवळील घटना.
सुरेश पाचभाई मारेगांव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज दिनांक 23 मार्च 2023 रोज गुरुवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.

शिवम नामदेव आत्राम वय सुमारे 21 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असुन तो सालेभट्टी ता.मारेगांव जि.यवतमाळ येथील रहिवासी आहे.आज तो दुचाकीने काही कामानिमित्त मारेगांव येथे आला होता तेथील काम आटोपुण तो गावाकडे जात असताना मांगरूळ जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली.

अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.व त्या तरुणांना लगेच मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शिवम यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.