ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,
मुकुटबन माथार्जून येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये कार्यरत असलेले प्रशांत नगराळे यांची पत्नी अश्विनी प्रशांत नगराळे वय 35 वर्ष यांचे चंद्रपूर येथे आज सकाळी प्रसूती दरम्यान मृत्यू झाला प्रसूतीनंतर बाळही दगावले त्यांच्या मृत्यूमुळे मुकुटबन येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे
सौ.अश्विनी व प्रशांत नगराळे यांचे दहा वर्षांपूर्वी रितीरीवाजाप्रमाणे विवाह संपन्न झाला अश्विनी हिला आठ वर्षाची मुलगी असून तिची ही दुसरी प्रसूती होती प्रसूतीचे कळा लागताच अश्विनीला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले परंतु प्रसूती दरम्यानच कळासहन न झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला व बाळही दगावले बाळ व बाळंतीणला मुकुटबन येथे आणल्यानंतर त्यांना एका चितेवर आई व मुलाला अग्नी देण्यात आले .ही घटना माहित होताच जनसागर घराच्या दिशेने उलटला होता हेमराज नगराळे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असून त्यांची ही सून होती.