सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव ठेंगणे,प्रचार प्रमुख यवतमाळ जिल्हा, कार्यक्रमाच्या उद्घाटक विजयाताई दहेकर,यवतमाळ जिल्हा महिला सेवाधिकारी, प्रमुख पाहुणे रुपेश रेंगे, युवाप्रमुख यवतमाळ जिल्हा,सुनील देऊळकर, मारेगाव तालुका सेवाधिकारी, राजू सिडाम,प्रचार प्रमुख मारेगाव तालुका, लोनसावळे महाराज,तालुका कीर्तनकार प्रमुख, सुभाष सप्रे, मध्यवर्ती प्रतिनिधी, रामभाऊ दरेकर, गुरुदेव प्रचारक, बंडूभाउ सूर, तालुका संघटक,
म्हैसदोडका येथील सरपंच ललिता तुरणकर,ढोले प्रचारक पिसगाव, मुस्तफाजी,कडूकर वनोजादेवी व मारेगाव तालुक्यातील गुरुदेव उपासकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर धानोरकर मध्यवर्ती प्रतिनिधी यांनी आभार प्रदर्शन कैलास बोंडे यांनी केले.कार्यक्रमाला नागरिक तथा गुरुदेव प्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.