राज्य महामार्गावर शिवनाळा फाट्याजवडील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव कडून करंजी कडे जाणाऱ्या आयसरची व करंजी कडून मारेगाव येणाऱ्या पिकअपने शिवनाळा फाट्याजवळ समोरासमोर जबर धडक दिली.यात तिन व्यक्ती जखमी झाले तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3:30 वाजताचे सुमारास राज्य महामार्गावरील शिवनाळा फाट्याजवळ घडली.
सदर आयसर गाडी हे मारेगाव कडून करंजी कडे जात होते तर करंजी कडून मारेगाव कडे येणाऱ्या पिकअप वाहन समोरासमोर धडकले.या धडकेत आयसर वाहनातील साहील शेख अमीर वय अंदाजे 19 वर्ष ,सय्यद युसूफ शेख वय अंदाजे 45 वर्ष,शेख मोहम्मद शेख जमील वय अंदाजे 32 वर्ष तिघेही रा. वणी हे जखमी झाले. यातील सय्यद युसूफ शेख गंभीर जखमी झाले आहे.
त्याच्यावर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचरा साठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.सदर अपघाचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.