सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सराटी येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोज बुधवारला वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कला व महोत्सव जि.प.उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव मिळावा यासाठी जी. प.उच्च प्राथमिक शाळा सराटी नेहमी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असते.याच अनुषंगाने दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सवाला आपल्या मारेगावचे तहसीलदार श्री.उत्तमजी नीलावाड साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

तहसीलदार साहेब यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा बाबत मार्गदर्शन केले.तसेच सांस्कृतिक महोत्सवाचा नृत्याचा आनंद अनुभवला. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मुकुंदजी माहूरे साहेब पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसील मारेगाव,ग्रामपंचायत सराटी येथील सरपंच श्री.तुळशीराम कुमरे, उपसरपंच श्री.प्रशांत टेकाम,सदस्य श्री.विष्णूजी कांबळे, सदस्य श्री.गणपतजी आत्राम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. विठ्ठलजी आत्राम ,
सदस्य श्री. मनोजजी ढेंगळे,सदस्य श्री.धर्माजी पोटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.हरिष दरबेशवार सर आणि इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री.रामकृष्ण देवगडकर सर यांनी केले.प्रास्ताविक श्री.मनोज लांजेवार सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.उमेश दोडेवार सर यांनी केले.अतिशय प्रसन्न अश्या सायंकाळी शांत वातावरणात गावकऱ्यांनी मोठ्या गर्दीने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.