ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक
शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ घोडदरा यांचे वतीने शिवजयंती साजरी
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगांव:-तालुक्यातील घोडदरा येथे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

सकाळी १० वाजताच्या सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ घोडदरा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

व सायंकाळी ६ वाजता ढोल ताशांच्या गजरात गावात भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली.शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ घोडदरा यांचे वतीने ही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक,युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.