ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी ‎‎‎परिसरात गुरुवारी ‎‎‎पहाटे साडेसात ‎‎‎वाजेच्या सुमारास ‎‎‎एका तरुणाची ‎‎‎धारदार शस्त्राने‎‎ वार करून निर्घृण ‎‎‎हत्या करण्यात ‎‎‎आली. वाहन ‎‎‎फायनान्सच्या ‎‎पैशांच्या देवाणघेवाणीतून हा‎ रक्तरंजित थरार घडल्याचे समोर‎ आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड ‎ रा. जामनकर नगर, ‎‎यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव ‎आहे. यात आधी वाद झाला होता. ‎‎त्यानंतर समेटही घडून आली होती. ‎‎मात्र, पुन्हा वाद उफळून हत्या‎ करण्यात आली. अवधूतवाडी ‎पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने ‎‎तत्परता दाखवत मुख्य आरोपीला ‎‎बेड्या ठोकल्या आहेत.‎ या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून ‎‎मिळालेल्या माहितीनूसार, मृत‎ सचिन राठोड हा शहरातील ‘पाटील ‎‎एंटरप्राइजेस’ या कंपनीत गाड्या‎सीझ (जप्त) करण्याचे काम‎ करायचा. हा जीवघेणा हल्ला पाहून ‎‎सचिनचे मित्र जिशान पाजी आणि‎ पोईन काझी हे त्याला वाचवण्यासाठी धावले. मात्र,‎संतप्त आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला ‎चढवला, ज्यामध्ये त्यांच्या हात आणि छातीवर ‎जखमा झाल्या. या दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या ‎सचिनने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ‎घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, रक्ताने‎ माखलेला आरोपी बकुल एवढ्यावरच थांबला नाही,‎ त्याने आपली गाडी काढली आणि सिनेस्टाईल ‎पाठलाग करून सचिनला गाठून जीवघेणा हल्ला‎ केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार‎ झाला. गंभीर जखमी झालेला सचिन हनुमान‎ मंदिराजवळ बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात‎ पडलेला मित्रांना दिसून आला. मित्रांनी अत्यंत गंभीर‎अवस्थेत त्याला एका चार चाकी वाहनातून तातडीने ‎जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,‎डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या ‎घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांचे ‎पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. मृत‎ सचिनचे नातेवाईक भोला राठोड यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.‎ प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अवधूतवाडी डिबी‎ पथकाने तातडीने चक्र फिरवली आणि मुख्य आरोपी‎ बकुल उर्फ शेख शाहीद शेख रफीक याला बेड्या‎ ठोकल्या. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या‎ संशयावरून ४ संशयितांनाही ताब्यात घेतले आहे.‎ ‘त्या’ सचिन राठोडची जीवनयात्रा संपली‎ भूतकाळातील गुन्हेगारीचे गडद सावट पाठीमागून‎ सारत, मुख्य प्रवाहात येण्याचा प्रामाणिक प्रयत्न‎ करणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.‎ अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला आणि‎ पोलिसांच्या एमपीडीए सारख्या कडक‎ कारवाईला सामोरा गेलेला यवतमाळातील कुख्यात‎ तरुण सचिन उर्फ येडा राठोड याची हत्या करण्यात‎ आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून‎ सचिनने गुन्हेगारी विश्वापासून पूर्णपणे अलिप्त राहून‎ सुधारण्याचा मार्ग निवडला होता. या कालावधीत‎ त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद पोलिसात नव्हती.‎गुन्हेगारीला रामराम ठोकून सन्मानाने जगण्यासाठी‎ काही दिवसांपूर्वीच त्याने यवतमाळ शहरात येत एका ‎फायनान्स कंपनीत कायदेशीर नोकरी पत्करली होती.‎ तडजोडीनंतरही धग‎ फायनान्सच्या पैशांच्या व्यवहारातून ‎निर्माण झालेला वाद थेट हत्येपर्यंत‎ पोहोचल्याची धक्कादायक घटना‎समोर आली आहे. दरम्यान‎ झालेल्या याच वादातून ‘येडा उर्फ‎सचिन राठोड’ नावाच्या तरुणाचा ‎गुरुवारी निर्घृण खून करण्यात‎ आला. बुधवारी रात्री दोन्ही ‎बाजूंमध्ये तडजोड झाली‎ असतानाही, आरोपीने मनात राग ‎ठेवून दुसऱ्याच दिवशी हा गेम ‎केल्याची प्राथमिक चर्चा आता‎ परिसरात रंगू लागली आहे.‎ जवळ बोलावून सपासप वार‎ गुरुवारी सकाळी सचिन हा त्याच्या ‎मित्रांसह विदर्भ हाउसिंग‎ सोसायटीतील हनुमान मंदिराजवळ‎ उभा होता. त्याच वेळी मुख्य ‎आरोपी बकुल उर्फ शेख शाहीद ‎तिथे पोहोचला. सुरुवातीला तो‎ मित्राशी बोलून निघून गेला, मात्र‎ काही वेळातच तो पुन्हा परतला.‎त्याने सचिनला जवळ बोलावले.‎ सचिन जवळ येताच बकुलने काही‎ समजण्याच्या आत तीक्ष्ण चाकू‎ काढून त्याच्यावर सपासप वार‎ करण्यास सुरुवात केली.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर