ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

८ वर्षांच्या मनस्वी पिंपरेची पांढरकवडा ते वणी ५० किमी स्केटिंग रॅली

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

फिट स्पोर्ट्स अँड युनिटी’चा सामाजिक संदेश

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : अवघ्या ८ वर्षांच्या वयात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा विदर्भाचा गौरव वाढविला आहे.

मनस्वी येत्या शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी पांढरकवडा ते वणी सलग ५० किलोमीटर अंतराची भव्य स्केटिंग रॅली साकारत असून, या माध्यमातून ती “फिट स्पोर्ट्स अँड युनिटी” हा महत्त्वाचा सामाजिक संदेश देणार आहे.

मुळगाव (चिं) बोटोणी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ असून सध्या कोंढवा, पुणे येथे वास्तव्यास असलेली मनस्वी ही जागतिक विक्रमवीर, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, तसेच नॅशनल स्केटिंग चॅम्पियन (२०२३, २०२५) आहे. तिने आतापर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करत २२ हून अधिक पुरस्कार व सुवर्णपदके पटकावली आहेत.

यापूर्वी मनस्वीने २०२४ मध्ये “बेटी बचाओ – बेटी पढाओ” या अभियानासाठी बोटोणी ते मारेगाव १२ किमी,२०२५ मध्ये “स्केट फॉर युवा” उपक्रमांतर्गत बोटोणी ते वणी ३० किमी सलग स्केटिंग करून समाजास प्रेरणादायी संदेश दिला होता.

यंदाची ही ५० किमी स्केटिंग रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरपरिषद पांढरकवडा यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

रॅलीची सुरुवात पांढरकवडा नगरपरिषद कार्यालयातून सकाळी ठीक ७ वाजता होऊन, समारोप अंदाजे सकाळी ११ वाजता वणी येथील शिवाजी पुतळा येथे होणार आहे.दरम्यान पांढरकवडा ते वणी मार्गावरील विविध गावे, शाळा, महाविद्यालये व सेवाभावी संस्था मनस्वीचे ठिकठिकाणी स्वागत व प्रोत्साहन देणार आहेत.

आजच्या युवा पिढीला खेळाकडे वळविणे तसेच २०३६ मध्ये भारतात होणाऱ्या संभाव्य ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर क्रीडासंस्कृती रुजविणे हा या रॅलीमागचा प्रमुख उद्देश आहे.

ही ऐतिहासिक स्केटिंग रॅली यशस्वी करण्यासाठी बोटोणी येथील युवक,तसेच मारेगाव व वणी तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मनस्वीच्या या अद्वितीय उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ती अनेक नवोदित खेळाडूंकरिता प्रेरणास्थान ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर