ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

महायुतीचा फॉर्म्युला फिक्स! रणसंग्रामाआधी मास्टरप्लॅन तयार:विधानपरिषदेत भाजपचा दबदबा, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 12 जागांवर उमेदवार देणार असून शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याचं बोललं जात आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता महायुतीची स्थिती मजबूत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू असून याच आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील जागावाटप करताना प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या आणि पक्षाची ताकद विचारात घेतली जात आहे. ज्या भागात ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक आहे, त्या पक्षाकडे संबंधित जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 12 जागा आल्या आहेत. काही ठिकाणी पारंपरिक जागांमध्ये बदल करण्याबाबतही चर्चा झाली असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्राथमिक चर्चेनुसार भाजप नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या 12 जागांवर दावा करणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या 3 जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी या 2 जागांवर निवडणूक लढवू शकते, अशी माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून 1 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे आता महायुतीसोबतच विरोधकांच्याही हालचालींना वेग आला असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर