ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न झाले असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. “नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण उभा राहिला आहे, हे महत्त्वाचे आहे,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही एक उपहासात्मक ऑनलाइन मोहीम आहे. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी CJI सूर्यकांत म्हणाले, “झुरळांसारखे असे तरुण आहेत, ज्यांना या व्यवसायात रोजगार मिळत नाहीये. यापैकी काही मीडिया, काही सोशल मीडिया आणि काही RTI व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनत आहेत. हे प्रत्येकजणावर हल्ला करायला सुरुवात करतात.” त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही मोहीम सुरू झाली. नेमके काय म्हणाले अण्णा हजारे? लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी कॉकरोच जनता पार्टीबाबत भाष्य करताना सरकारला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “झुरळ हे नाव कदाचित योग्य वाटणार नाही, पण या पार्टीचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. नाव काहीही असले तरी देशातील तरुण या पार्टीच्या पाठीशी उभा आहे. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती असते. जेव्हा या दोन्ही शक्तींचा संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” बंदीनंतर पुन्हा उभारी; इन्स्टाग्राम खाते परत मिळाले दरम्यान, गेल्या काही दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट आणि त्यानंतर १० लाख नोंदणी झालेले अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. यंत्रणांनी दिलेल्या या झटक्यानंतरही सीजेपीने हार मानलेली नाही. संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा मिळवले असून पक्ष नव्या दमाने कामाला लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात दरम्यान, या आभासी पक्षामुळे चर्चेत आलेले अभिजीत दीपके यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सिडको वाळूज महानगर-१ येथील त्यांच्या पालकांच्या घरासमोर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी दोन अधिकारी आणि २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर