ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

नीट पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवा:अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन! हिंगोलीत ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरावर तातडीने बुलडोझर फिरवावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील सावंत, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे, शंकर घुगे, भानुदास जाधव, युवासेना विस्तारक दिलीप घुगे, विठ्ठल चौतमल, संतोष देवकर, आनंदराव जगताप, ज्ञानेश्‍वर झटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी नांदेड येथे शिकवणी क्लासेसला जातात. पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पालक पोटाला चिमटा घेऊन क्लसेसचे शुल्क भरतात. मात्र नीट पेपर फुटीमुळे मोटेगावकर क्लासेसचे बिंग फुटले आहे. या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागले असून पेपर फोडून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी केली आहे. त्यामुळे नीट परिक्षेचा पेपर फोडणाऱ्यांची सखोल चौकशी करावी. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावीच पण या सोबतच त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवावा. ज्यामुळे पुन्हा असे प्रकार करण्यास कोणीही धजावणार नाही. शासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. या शिवाय आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याची मागणीही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर