ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

उन्हाचा सामना करत १३.५६ तासांत २६७ किमीचे अंतर पार:चारसायकलप्रेमींची अहिल्यानगर ते रायगड खडतर सायकल वारी यशस्वी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अहिल्यानगर शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरमधील सायकलप्रेमी मावळ्यांनी ‘अहिल्यानगर ते किल्ले रायगड’ अशी विशेष सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. भर उन्हाळ्यातील उन्हाचा कहर, विरुद्ध दिशेने वाहणारे प्रचंड वारे आणि तब्बल २,८०० मीटर चढाईचा (एलिव्हेशन) खडतर मार्ग अशा सर्व आव्हानांवर मात करत या सायकलप्रेमींनी १३ तास ५६ मिनिटांच्या प्रत्यक्ष सायकलिंग वेळेत हे अंतर कापून गडपती शिवरायांच्या चरणी आपली वारी अर्पण केली. या सायकल वारीत अहिल्यानगरचे सायकलप्रेमी शरद डोंगरे, डॉ. धनंजय राजगुडे, सत्यनारायण पुरोहित आणि बापू कांडेकर या चौघांचा समावेश होता. २३ मे रोजी पहाटे ५ वाजता अहिल्यानगरमधून या सायकल वारीचे प्रस्थान झाले. मनात रायगड गाठण्याची जिद्द आणि वेळेचे अचूक नियोजन करून सायकलप्रेमींनी प्रवासाला सुरुवात केली. कुठेही जास्त वेळ न घालवता पहिल्याच दिवशी २१० किलोमीटरचे मोठे अंतर पार करत, हे सायकलप्रेमी अंधार पडायच्या आत मुळशी परिसरातील ताम्हिणी घाटात पोहोचले. ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य वातावरणात पहिल्या दिवसाचा मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी (२४ मे) सकाळी ताम्हिणी घाटातून पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. अत्यंत अवघड मानला जाणारा हा टप्पा पार करत, निजामपूरमार्गे सायकलप्रेमी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे सुखरूप पोहोचले. अहिल्यानगर, शिरूर, वाघोली, डेक्कन, कोथरूड, मुळशी, ताम्हिणी घाट, निजामपूर ते पाचाड आणि अंतिम टप्पा किल्ले रायगड असा एकूण २६७ किलोमीटरचा प्रवास या मावळ्यांनी सायकलवर पूर्ण केला. ही केवळ राईड नव्हती, तर शिवचरणी भक्ती होती ^ भर उन्हाळ्यात २६७ किमीची सायकल वारी करणे हे आमच्यासाठी शारीरिक आव्हान नव्हते, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली एक भक्ती होती. प्रवासादरम्यान मे महिन्याचे कडक ऊन आणि समोरून येणारे वारे आमची परीक्षा घेत होते. त्यातच २,८०० मीटरचे एलिव्हेशन (चढण) पार करताना पाय थकत होते, पण मनातील रायगड गाठण्याची आणि शिवरायांना अभिवादन करण्याची जिद्द आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देत होती. – शरद डोंगरे, सायकलप्रेमी, अहिल्यानगर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर