ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

‘आपला दवाखाना’ साठी 48.57 कोटींचा निधी:तब्बल 105 प्रकारची औषधे मिळणार मोफत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत औषध खरेदीसाठी तब्बल ४८ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून तब्बल १०५ प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची खरेदी केली जाणार असून, ती रुग्णांना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी (१७ जून) या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ही योजना राबवली जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण राज्यात एकूण ७०० ठिकाणी “आपला दवाखाना’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी सध्याच्या घडीला तब्बल ४७५ केंद्रे यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एकूण १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मंजूर निधीमधून पहिल्या टप्प्यात ४८.५७ कोटी रुपये औषध खरेदीसाठी वर्ग करण्यात आले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी ही सर्व खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिनियम, २०२३ नुसार थेट प्राधिकरणाकडून केली जाणार आहे. कोणत्याही विशिष्ट कंपनीला नफा होणार नाही, याची काळजी घेत तांत्रिक समितीच्या निकषांनुसारच जेम पोर्टलद्वारे औषधांची खरेदी करण्याचे कडक निर्देश शासनाने दिले आहेत. आर्थिक भार पूर्णपणे हलका होणार या निर्णयामुळे राज्यातील लाखो गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, औषधांवरील त्यांचा आर्थिक भार पूर्णपणे हलका होणार आहे. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता गंभीर आजारांवर लागणारी आणि दैनंदिन उपचारांची औषधे हक्काच्या ठिकाणी मोफत उपलब्ध होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर