ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

पहिल्याच पावसात पुणे मेट्रोला गळती?:प्रवाशांची तारांबळ, पिंपरी-स्वारगेट पर्पल लाईनवरील प्रकार; प्रशासनाकडून तांत्रिक कारणाचे स्पष्टीकरण

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील अत्याधुनिक आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाहेर पाऊस पडत असताना चक्क मेट्रोच्या कोचमध्येही पाण्याच्या धारा पडू लागल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, काही वर्षांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या दर्जाबाबत आता प्रवाशांकडून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२१ मे) सायंकाळी पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी पिंपरी-स्वारगेट पर्पल लाईनवरून धावणाऱ्या एका मेट्रो कोचमध्ये अचानक छतातून पाणी गळू लागले. टपकणाऱ्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रवासी इकडे-तिकडे सरकताना दिसले, मात्र अनेक प्रवाशांना या गळतीमुळे भिजावे व्हावे लागले. डब्यात बसलेल्या काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या आधुनिक सुविधेची पहिल्याच मोठ्या पावसात अशी दैना उडाल्याने मेट्रोच्या बांधकाम आणि देखभालीच्या दर्जावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाचे तांत्रिक बिघाडाचे स्पष्टीकरण हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने तातडीने यावर आपली बाजू मांडली आहे. पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही घटना २१ मे रोजी संध्याकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास ‘ट्रेन सेट-५’ मध्ये घडली. पावसाचे पाणी थेट छतातून आत आलेले नाही, तर मेट्रोमधील वातानुकूलित यंत्रणेशी (AC) संबंधित असलेल्या ‘HVAC’चा ड्रेन पाईप चोकअप (ब्लॉक) झाला होता. हा पाईप ब्लॉक झाल्यामुळे एसीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट कोचच्या आत गळू लागले. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांमध्ये संताप पुणे मेट्रोला सुरू होऊन अद्याप फार काळ लोटलेला नाही. असे असताना पहिल्या काही पावसांतच जर मेट्रोची ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यात प्रवाशांनी प्रवास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाची ही दुरवस्था पाहून नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर