ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत आनंदमेळावा उत्साहात संपन्न

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी कळंब : रितेश क्षिरसागर

स्थानिक कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य आनंदमेळावा उत्साहात संपन्न झाला.शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक प्रा. रविशंकर ऊर्फ बाळासाहेब धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब नगरपंचायतेचे बांधकाम सभापती चंद्रशेखर चांदोरे यांच्या हस्ते आनंदमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राळेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विनय मुनोत व गजानन अक्कलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अशीच महाजन हे कार्यक्रमाचे संयोजक होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. उद्घाटक चंद्रशेखर चांदोरे यांनी आपल्या भाषणात सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व व्यवहारिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

नोकऱ्यांची मर्यादा लक्षात घेता बालवयापासूनच व्यवहारज्ञान विकसित करणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मनोगतात प्रा. बाळासाहेब धांदे यांनी आनंदमेळावा हा केवळ खाद्यपदार्थांचा उत्सव नसून विद्यार्थ्यांना व्यवहारातील बारकावे समजावून देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनून भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन मयूर होले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. शालू सदाफळे, कु. चंद्रभागा मेश्राम, सौ. प्रांजली दरणे, शिवम चांदोरे, विठ्ठल राठोड व देवानंद चांदोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर