ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:”मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दहिगाव शे. मध्ये लोकसहभागातून अनेक नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या. याच बळावर या गावाने जिल्हा स्तरापर्यंत मजल मारली आहे. याच पार्श्वभूमीवर, जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच दहिगाव शे. ग्रामपंचायतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी समितीच्या सदस्यांनी गावातील विकासकामे, उपलब्ध सोयी-सुविधा आणि योजनांच्या दप्तराची सविस्तर पडताळणी केली. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी समितीला गावाच्या प्रगतीचा आलेख सादर केला. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले. जिल्हा स्तरावरही दहिगाव शे. उत्कृष्ट कामगिरी करून गावाचा गौरव वाढवेल, असे सरपंच रामेश्वर भापकर यांनी सांगितले. दहिगाव शे गावाची पाहणी करण्यासाठी आलेली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा कमिटी .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर