टोबणी साठी सारे काढतांना शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट
आज दुपारी १:३० वाजता झरी ,मार्थाजून व शिबला
परिसरात जोरदार वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरीजामणी:-तालुक्यातील शेतशिवारात पेरणीचे चे काम करत असतांना आज दुपारी दीडच्या सुमारास गजानन पोचीराम टेकाम वय ४२ वर्ष रा. मुदाटी व लिंबेश कवडू आत्राम वय ३०वर्षे रा. राजणी या दोन शेतकऱ्यांना आपला जिव गमवावा लागला असून मारोती सुर्यभान टेकाम वय ४० रा. मुदाटी एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यात काल रात्री हलका पाऊस पडल्याने शेतकरी कपासी टोबणी च्या कामाला वेग आला आहे . मुदाटी येथिल शेतकरी गगजानन टेकाम यांचे कडे स्वतःची १.३० हेक्टर जमीन असून कपासीची टोबणी करण्या करिता सारे (सारण्या ) काढत असतांना दुपारी दीड वाजता विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु झाला.त्यामुळे गजानन आडोशासाठी कडुलिंबाच्या झाडाखाली उभा राहिला व त्याच झाडाखाली विरोधी बाजूला त्याचा चुलत भाऊ मारुती सुर्यभान टेकाम उभा होता.त्याचे वेळी.अचानक निंबाच्या झाडावर वीज पडली गजानन व मोरोती जखमी होवून खाली पडले.
ही घटना शिवारातील लोकांना कडताच त्यांना उचलून झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परतु गजानन ला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून मारोती विजेच्या धक्क्याने प्रभावित झाला असून त्यांच्या वर उपचार चालू आहेत.
तर अशाच प्रकारची घटना राजनी शिवारात घडली आहे . राजणी येथील शेतकरी लिंबेश कवडू आत्राम यांचे कडे स्वतःची दोन एकर शेती आहे . हा सुद्धा टोबणी करता सारे काढत असताना विजांचा कडकडाट व पाऊस सुरू झाल्याने मोहाच्या झाडाखाली आडोशा करिता मोहाच्या झाडा खाली गेला होता नेमकी त्या झाडावर वीज कोसळल्याने लिंबेश च्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तो त्या झाडाखाली कोसळून मृत्य झाला आहे .
पाटणच्या ठाणेदार सांगिता हेलोडे व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही ठिकाणचा पंचनामा केला व दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाटविण्यात आले आहे .घटना कळताच त्यांना पाहण्याकरिता राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व अनेक नागरिकांनी दवाखान्याच्या आवारात गर्दी केली होती.गरिब कुटुंबातील मेहनती कर्ते व्यक्ती गेल्याने तुम्ही कुटुंबाचा आधार गेला आहे. दुखःद घटना आणि कुटुंबातील लोकांचा आक्रोश पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.