दोन मजुराला विजेचा धक्का शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट
सुमारे एक लाख पंधरा हजाराचे शेतकऱ्यांचे नुकसान.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव:-तालुक्यातील सालई पोड (खंडणी) गावा जवळील शेतशिवारात टोबनी चे काम करत असतांना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास लक्ष्मण चंडकु टेकाम वय सुमारे 55 वर्ष रा. सालई पोड (खंडणी) येथील शेतकऱ्यांचा शेतातील गोठ्या मध्ये 2 बैल बांधलेले होते.व पाऊस जोरात सुरु असल्या मुळे काही मजुर त्या ठिकाणी गेले होते.
अचानक विजेचा कडकडाट सुरु झाला व काही वेळातच विज कोसळली त्या मुळे गोठ्यातील दोन बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर 2 महिला मजुराला विजेचा धक्का बसल्याची घटना सालई पोड (खंडणी) येथील गावा जवळील शेतात घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
लक्ष्मण चंडकु टेकाम वय सुमारे 55 वर्ष रा. सालई पोड (खंडणी) यांचे कडे 3 एकर शेत सालई पोड (खंडणी) गावाला लागून आहे आज दिनांक 15 जुन 2022 रोज बुधवारला गावा लगतच्या शेतामध्ये टोबणीचे काम सुरु होते.दुपारी 3 वाजता सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु झाला त्या मुळे लक्ष्मण टेकाम व शेतातील मजुर आसऱ्या साठी शेतातील गोठ्या मध्ये गेले.
काही वेळा आधीच त्याच गोठ्या मध्ये त्यांचे 2 बैल बांधालेले होते. पाऊस सुरु होताच शेतकरी व शेतमजूर गोठ्यात थांबले होते.काही वेळातच विज पडून दोन बैलाचा मृत्यू झाला तर 2 महिलाना वीजेचा धक्का बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच खंडणी येथील तलाठी काही वेळातच घटना स्थळी दाखल झाले. आणि घटनेचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
Mitra no sadark rha kaun ki aj cha vijeche kai sangta nai yet kaun ki te kote hi pdte ani khub lokhan che nuskan hot ahe tr tanchi jabhab dari kon genar ani aj kal jastit jast mrituv hot ahe ani sarcar mantat ki dar vali lokh mart tat ka br
Mitrano sport kra