वणी – वरोरा मार्गावरील सावर्ला येथील घटना
सुदैवाने जीवित हानी टळली.
तालुका प्रतिनिधी :- वणी
वणी तालुक्यातील :- सावर्ला जवळ आज दिनांक 15 जून 2022 रोज बुधवारला 3 वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावा जवळ भरधाव ट्रकने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा पार चुराडा झाला. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

सविस्तर वृत्त – वरोरा मार्गावरील सावर्ला गावा जवळ आज दुपारच्या वेळी एक विटा भरलेले ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे होते.विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक ने जबर धडक दिली रोडच्या बाजुला उभे असलेले ट्रॅक्टर खाली फेकल्या गेले. हा अपघात ईतका भिषण होता.

की भरधाव ट्रकने चक्क ट्रॅक्टरची ट्रॉलीच्या अर्ध्या भागावर चढल्याने ट्रॉली ट्रकखाली दबल्या गेली. या अपघातात ट्रॅक्टरचे मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. असुन पुढील तपास वणी पोलिस करत आहे.