ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड:खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांची आज SIT कडून चौकशी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची चौकशी केली जात आहे. सौरव सोनवणे यांची केज पोलीस ठाण्यात तासाभरापासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपींनाही आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे नाव या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलकांनी आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पुरवणी जबाबात नाव आल्यामुळे वस्तुस्थिती पडताळण्यासाठी एसआयटीमार्फत सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनीही पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. “पोलीस प्रशासन ज्या वेळी बोलावेल, त्या वेळी आम्ही चौकशीसाठी हजर राहू,” असे त्यांनी सांगितले होते. नेमके काय आहे विलास घुले हत्या प्रकरण? 20 जूनच्या रात्री केज तालुक्यातील टाकळी येथे एका वादातून हल्ल्याची घटना घडली होती. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सलग तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच नातेवाईकांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध नोंदवला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून नऊ आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. धनंजय मुंडेंनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा या हत्येचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत, “या हत्येमागील खरा सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास व्हावा,” अशी मागणी केली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सर्वंकष तपास करण्याबाबत लेखी निवेदनही दिले. आज होणाऱ्या सौरव सोनवणे यांच्या चौकशीनंतर तपासात कोणते नवे धागेदोरे समोर येतात आणि एसआयटी पुढे काय भूमिका घेते, याकडे बीडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संबंधित बातमी वाचा… मी बीडचा वाघ, घाबरत नाही!:विलास घुले हत्याप्रकरणी मुलावरील आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे आक्रमक; धनंजय मुंडेंवर नाव न घेता घणाघात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर, खासदार सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “मी काय भित्रा नाही, मी बीडचा वाघ आहे,” असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी बीड हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित:मुंडे बंधू-भगिनी आक्रमक, पूर्वनियोजित कटाचा आरोप, सभागृहात जोरदार चर्चा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत गृह विभागाला योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी बीडमध्ये खळबळ!:भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल चालकाची चाकूने भोसकून हत्या, केजमध्ये तणावाचे वातावरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन गटांतील भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या भीषण घटनेमुळे केज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी थेट पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर