ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कंबोडियात माझ्यासह 6 भारतीयांची किडनी काढली:चंद्रपूरच्या पीडित शेतकऱ्याचा दावा, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय; SIT स्थापन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सावकारी पाशात अडकून चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याला कंबोडियात जाऊन किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणाने आता भयानक वळण घेतले आहे. पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी एक खळबळजनक दावा केला असून, “कंबोडियात माझ्यासोबत आणखी 6 भारतीय तरुणांची देखील किडनी काढण्यात आली,” असे शेतकऱ्याने सांगितले.

शेतकऱ्याच्या दाव्यामुळे हे केवळ स्थानिक सावकारी प्रकरण नसून, यामागे मोठे आंतरराष्ट्रीय अवयव तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन कुडे यांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आपबीती सांगितली. त्यांच्या माहितीनुसार, कंबोडियातील रुग्णालयात किडनी काढण्यासाठी नेण्यात आलेल्या लोकांमध्ये त्यांच्यासोबत राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील तरुणांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, या गटासोबत असलेला नाशिकचा एक तरुण विमानतळावरूनच पळून जाण्यात यशस्वी झाला, अशी माहिती कुडे यांनी दिली. यामुळे या रॅकेटची व्याप्ती देशभर पसरली असल्याचा संशय बळावला आहे. नेमके प्रकरण काय?

कोरोना काळात दुग्ध व्यवसायात आलेले अपयश आणि जनावरांना झालेली ‘लंपी’ आजाराची लागण यामुळे रोशन कुडे आर्थिक संकटात सापडले होते. सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज फेडता आले नाही. सावकारांनी वसुलीसाठी पाशवी पद्धतीचा वापर केला. 1 लाख रुपयांच्या मुद्दलावर दिवसाला 10 हजार रुपये व्याज आकारण्यात आले. बघता बघता 1 लाखाचे कर्ज तब्बल 74 लाखांवर पोहोचले. सावकारांच्या जाचाला कंटाळून रोशन यांनी आपली दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील चीजवस्तू विकल्या. तरीही सावकाराचे समाधान झाले नाही. कर्ज फिटत नसल्याचे पाहून सावकाराने रोशनला किडनी विकण्याचा अमानुष सल्ला दिला. त्यानंतर एका एजंटमार्फत त्यांना आधी कोलकाता येथे नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना थेट ‘कंबोडिया’ देशात नेण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली आणि ती 8 लाख रुपयांना विकली गेली. जीव धोक्यात घालून मिळवलेले हे पैसेही सावकाराच्या घश्यात गेले.

तपासासाठी ‘SIT’ ची स्थापना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे देण्यात आले आहे. या पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले, एलसीबीचे निरीक्षक अमोल कचोरे, सायबरचे निरीक्षक सुनील गाडे आणि ब्रह्मपुरीचे निरीक्षक प्रमोद बानबले यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक आता या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ शोधून काढणार आहे.

आणखी दोन संशयितांची नावे पुढे तपासादरम्यान किडनी काढण्याशी संबंधित ‘डॉ. कृष्णा’ याच्या नावाचा खुलासा आधीच झाला आहे. आता पोलिसांना आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांची भूमिका तपासली जात आहे. तसेच सावकार आणि पीडित शेतकरी यांच्यातील आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळवण्यासाठी बँकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण झाली, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे.

पाच आरोपी अटकेत या प्रकरणात आतापर्यंत पाच सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांची पोलिस कोठडी 20 एप्रिलला संपत असून, ती वाढवून मागण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या तपासात आता आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर