ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे यश:स्ट्रॉबेरी प्लेटच्या धर्तीवर “ट्रायकोडर्मा’ कंटेनरला मिळाले भारतीय पेटंट!

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा रोगशास्त्रज्ञ डॉ. पोपट खंडागळे यांनी स्ट्रॉबेरीच्या प्लेटप्रमाणे जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’ तयार करण्यासाठी एक विशेष रचना प्रारूप विकसित केले आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. सध्या व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात ट्रायकोडर्मा (जैविक बुरशीनाशक) तयार करण्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो. या बाटल्या प्रत्येक वेळेस ऑटोकलेव्हमध्ये ठेवून पूर्णपणे निर्जंतुक कराव्या लागतात, ज्यामध्ये वेळ आणि खर्च अधिक होतो. मात्र, डॉ. खंडागळे यांनी तयार केलेल्या नव्या कंटेनरमध्ये अंतर्गत निर्जंतुकीकरणाची गरज भासणार नाही. या प्लेटच्या केवळ बाह्य निर्जंतुकीकरणावरही बुरशीची अत्यंत योग्य आणि दर्जेदार वाढ होते. हे संशोधन शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि अधिक प्रभावीपणे जैविक बुरशीनाशक उपलब्ध करून देण्यास मैलाचा दगड ठरेल. यामुळे उत्पादन प्रक्रियेतील खर्च कमालीचा कमी होईल. हे कंटेनर तयार करण्यासाठी वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. टी. गायकवाड, गहू विशेषज्ञ डॉ. बी. एम. म्हस्के, डॉ. एस. बी. गावडे, डॉ. एन. एम. मगर, श्री. डी. बी. पाटील, डॉ. पी. बी. खैरे व डॉ. एच. आर. कुमावत यांचे सहकार्य लाभले. श्रम आणि पैशांची मोठी बचत; पर्यावरणपूरक पर्याय या नव्या तंत्रज्ञानामुळे वारंवार निर्जंतुकीकरण करावे लागणार नसल्याने कृषी प्रयोगशाळांच्या वीज बिलात मोठी कपात होईल, तसेच मानवी श्रमाचीही बचत होणार आहे. हे कंटेनर अत्यंत स्वस्त, रिसायकलेबल (पुनर्वापरायोग्य), प्रदूषण विरहित आणि बाजारात सहज उपलब्ध होणारे आहे. यामुळे भविष्यात जैविक खते आणि बुरशीनाशकांचे उत्पादन करणे अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर