ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह – PHOTO:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह हजारो शिवभक्त उपस्थित

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय…” च्या जयघोषात आज किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली असून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा केला. दोन दिवसांचा ऐतिहासिक सोहळा शिवराज्याभिषेक दिनोत्सव उत्सव समिती आणि विविध शिवभक्त संघटनांच्या वतीने गडावर या दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली असून, गड आणि परिसर भगव्या पताकांनी आणि शिवकालीन वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला आहे. राज्यभरातून शिवभक्त रायगडावर
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून हजारो शिवभक्त आणि शिवप्रेमी शुक्रवारी रात्रीपासूनच पायथ्याशी आणि गडावर दाखल झाले आहेत. शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून गडावर विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साहात जल्लोष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नागपुरात विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांनी पारंपरिक पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत महाराजांना अभिवादन केले. यावेळी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिववंदनेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे लक्ष ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या विदर्भ दौऱ्याची पहिली जाहीर सभा आज सकाळी १० वाजता यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर