नरसाळा येथील घटणा.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.
आज दिनांक 27ऑगस्ट 2022 रोज शनिवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास नरसाळा येथील गजानन नारायण मुसळे वय सुमारे 28 वर्ष हा नेहमी प्रमाणे नरसाळा येथील शेतशिवारात जनावरे चरायला गेला होता व एका शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहिती नुसार गजानन नारायण मुसळे वय सुमारे 28 वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो शेती करायचा व त्याच्या वडिलांच्या नावाने 8 एकर शेती नरसाळा व म्हेसदोडका येथे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो शेती करून आपला कुटुंबाचा उद्धार निर्वाह करायचा गजनान यांचे लग्न काही वर्षा आधी झाले होते.पण लग्नाच्या 3 दिवसात त्यांची पत्नी त्याला सोडुन गेल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
या घटनेची माहिती मारेगाव मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यांचे मागे आई, वडील, एक लहान भाऊ,असा आप्त परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार किसन संकुलवार करीत आहेत.