म्हैसदोडका येथील 30 वर्षीय विवाहीत युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

0
61

चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.

म्हैसदोडका येथील घटना.

एका महिन्यात दोन सख्या भावाच्या आत्महत्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील सुमारे 30 वर्षीय विवाहीत युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. म्हैसदोडका येथील सतिश वासुदेव बोथले वय सुमारे 30 वर्ष रा. म्हैसदोडका असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवकाचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार सतिश वासुदेव बोथले यांने दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहते घरी विषारी किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. पण काही तास नंतर उपचारा दरम्यान 26 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झालाची महिती प्राप्त झाली आहे.सतिश यांच्या वडिलांच्या नावाने म्हैसदोडका येथे 2 एकर शेती आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. एक महिन्या आधी त्याच्या भावाने पण आत्महत्या केली होती.त्या मुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

असून सतिश यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ,पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त आहे.सतीश याचा मृतदेह म्हैसदोडका येथे त्याच्या स्वगावी आज आणण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here