मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशन (जंगल)येथील सुपुत्र व यवतमाळ पोलिस अधीक्षक कार्यालय CRO कार्यरत असलेले बाबाराव रामचंद्र किर्तीवार यांना बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी पदोन्नती आदेश प्राप्त झाले असून त्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात यवतमाळ येथे पोलीस उपनिरीक्षक (PSI)पदी नेमणूक झाली. त्यांच्या पदोन्नती बद्दल सर्व स्तरावरून त्यांच अभिनंदन होत आहे.
बाबाराव रामचंद्र किर्तीवार यापूर्वी मारेगाव, वणी, शिरपूर, पांढरकवडा या ठाण्याला कार्यरत होते. पुन्हा मारेगांव येथे आणि आता पोलिस नियंत्रण कक्ष यवतमाळ [CRO]ला कार्यरत असतांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नत्ती केली असून त्यांच्या विविध कामाची पोच पावती म्हणून त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल वडगाव सह यवतमाळ,वणी, मारेगाव शिरपूर, पांढरकवडा परिसरात अभिनंदन होत आहे.

विदर्भ SP न्युजच्या टीम कडून पोलीस उपनिरीक्षक बाबाराव रामचंद्र किर्तीवार यांना हार्दिकअभिनंदन