ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

अवघ्या 20 दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज, पतीला वेगळाच संशय, मित्रासह स्मशानभूमीत नेलं, भयंकर कृत्यानं चंद्रपूर हा…

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर : अवघ्या 20 दिवसांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीचा प्रियकर पतीनंच अमानुष छळ केल्याचा प्रकार चंद्रपूरमधून पुढं आला आहे. पत्नीवर संशय घेऊन पतीने मित्राच्या मदतीने तिला स्मशानभूमीत नेलं आणि तिच्यावर दोघांनी अत्याचार केले. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पतीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर यांची जात वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता. मात्र, त्या विरोधाला न जुमानता दोघांनी 6 ऑगस्ट रोजी नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. लग्न केल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी नाईलाजाने या नात्याला संमती दर्शवली. तसेच कुटुंबीय लवकरच मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे पुन्हा विवाह सोहळा पार पाडण्याची तयारी करत होते. त्यामुळे दोघेही पुन्हा आपापल्या घरी राहत होते.

मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं कांड की सगळे हादरले

पत्नीचा फोन व्यस्त

25 ऑगस्ट रोजी पतीने पत्नीला फोन केला. तेव्हा फोन व्यस्त असल्याचं लक्षात आलं. वारंवार फोन करून देखील फोन व्यस्तच येत होता. त्यानंतर तो तिच्या घरी गेला. तेव्हा देखील ती फोनवर बोलत असल्याचे पाहून संशयाचं भूत डोक्यात गेलं. दोघांत तीव्र वाद झाला आणि पतीनं तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली.

स्मशानभूमित नेलं आणि…

संतापलेल्या पतीच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं. तरुणी शिवण क्लासला गेली. तेव्हा पती तिच्यावर पाळत ठेवून तिला गाठलं आणि मित्राच्या मदतीने जबरदस्तीने निर्जन स्मशानभूमीत नेलं. तिथं पतीनंच मित्र कुणाल बोरकर (वय 19) याच्यासह तरुणीवर अत्याचार केले. पतीच्या या कृत्यानं तरुणीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने थेट दुर्गापूर पोलीस ठाणं गाठलं. तसेच घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीवरून दुर्गापूर पोलिसांत पतीसह मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दोघांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर