ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Chandrapur : पोलवर चढले कर्मचारी अन् वाघाची एंन्ट्री, कशी झाली सुटका?

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनते लाईट काम करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी लाईटच्या पोलवर चढले होते. लाईटीची दुरूस्ती करत असताना अचानक घटनास्थळी वाघाची एंन्ट्री झाली. या एंन्ट्रीमुळे कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली होती. तसेच वाघ त्या स्थळावरून हलायलाच तयार नव्हता.त्यामुळे कर्मचाऱ्यांची खूप वाईट अवस्था झाली होती. दरम्यान या घटनेत पुढे काय घडलं? कर्मचाऱ्यांची सुटका झाली का? हे जाणून घेऊयात.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील महावितरण उपविभागात येणाऱ्या फुलझरी गावात ही घटना घडली आहे. गावाजवळील जंगलात असलेल्या वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम करण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्याची एक तुकडी गेली होती. यावेळी कर्मचारी कामात व्यस्त अचानक वाघाची एंन्ट्री झाली.

यावेळी वाघाला पाहताच कर्मचारी सैरावैरा पळत सुटले.कुणी झुडपात जाऊन लपलं, तर इतर कर्मचारी सुरक्षित ठिकाणी लपले.एका कर्मचाऱ्याकडे पळायला वेळच नव्हता म्हणून तो थेट लाईटच्या पोलवर चढला होता. त्यानंतर वाघ पोलच्या घिरट्या घालत होता. त्यामुळे पोलवर चढलेला कर्मचारी जवळपास तासभर अडकून पडला होता.

जवळपास तासभर त्याने भक्ष्याची वाट बघितल्यानंतर शेवटी तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर वाघ निघून गेल्यानंतर कर्मचारी परतले आणि त्यांनी काम आवरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फुलझरी गावात महावितरण कर्मचाऱ्यांसमोर अचानक वाघ आल्याने एकच खळबळ उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विजेच्या पोलवर चढून तब्बल एक तास काढला. वाघ निघून गेल्यानंतर त्यांनी सुरक्षितपणे काम पूर्ण केले आणि खाली उतरले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर