ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं …

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : आयु्ष्यभराचा जोडीदार शोधण्यासाठी आजकाल अनेकजण मॅट्रिमोन साईटवर आपलं प्रोफाईल बनवतात. इथे अनेकांना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळतातही आणि ते विवाहबंधनातही अडकतात. मात्र, काहीवेळा इथे एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं भलतंच महागातही पडू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना पुण्यातील एका महिलेसोबत घडली.

पुण्यातील जनवाडी भागात राहणाऱ्या एका महिलेने विवाहविषयक संकेतस्थळावर स्वतःचे नाव नोंदवले होते. आरोपीने तिथे फ्रान्समधील एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कामाला असल्याचे बनावट प्रोफाईल तयार केले होते. आरोपीने महिलेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली.

काही दिवसांनंतर आरोपीने महिलेला भेटण्यासाठी फ्रान्सहून भारतात येत असल्याचे सांगितले. नवी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर, "सीमाशुल्क विभागाने माझ्याकडील ८ हजार युरो हे परदेशी चलन जप्त केले आहे. ही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील," अशी भुलथाप त्याने महिलेला मारली.

त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून महिलेने वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तब्बल २१ लाख ८९ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला. महिलेने फोन केला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद आढळला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून आणि परदेशातून भेटायला येत असल्याचे सांगून महिलेची तब्बल २१ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅट्रिमोनी वेबसाईट्स किंवा सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. कस्टम ड्युटी, महागड्या भेटवस्तू किंवा आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून कोणी पैसे मागितल्यास तात्काळ सतर्क व्हा आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर