ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर:  चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचव्या वर्गात शिकणाऱ्या २ अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रकरण उघड झालंय. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्या आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बल्लारपूर तालुक्यातील अनुदानित खाजगी आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच अन्य दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित सख्खे भाऊ

हा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील घडलाय. आरोपींचे वय सुमारे १० ते ११ वर्षे आहे. पीडित विद्यार्थी हे सख्खे भाऊ आहेत. पीडित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे केवळ आश्रमशाळा आणि तिथल्या वसतिगृहाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून, एवढ्या लहान वयातील मुलांमध्ये अशी विकृत मानसिकता कशी निर्माण होत आहे, याबाबतही गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

या आश्रमशाळेत मुला-मुलींच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. मुलांच्या एका खोलीत सुमारे १२ ते १५ विद्यार्थी राहत असून, पीडित आणि आरोपी विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. घटनेमागील नेमकी कारणं तसेच वसतिगृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आरोपी विद्यार्थ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

35 विद्यार्थांचा नोंदवला जबाब

आतापर्यंत वसतिगृहातील सुमारे 35 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आला असून इतर विद्यार्थ्यांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही; मात्र त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा अनियंत्रित वापर, अश्लील कंटेंटपर्यंत सहज पोहोच, मुलांशी संवादाचा अभाव तसेच लैंगिक सुरक्षिततेबाबत योग्य शिक्षणाचा अभाव ही अशा घटनांमागील संभाव्य कारणे मानली जात आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर