ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर: महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर सरकारचा भर आहे. आता पूर्व विदर्भात आणखी तीन मोठ्या वेगवान महामार्गांची निर्मिती केली जाणार आहे. नागपूर ते गोंदिया, नागपूर ते चंद्रपूर, भंडारा ते गडचिरोली द्रुतगती महामार्गासह नवेगाव मोरे ते सुरजागड मार्गाच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तब्बल 42 हजार कोटींच्या या प्लॅनमुळे पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे.

पूर्व विदर्भात 460 किलोमीटरच्या महामार्गांचे नव जाळे विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच राज्य सरकारने तीन द्रुतगती महामार्गांवर नवेगाव मोरे ते सुरजागड मार्गाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आता या महामार्गामुळे पूर्व विदर्भातील कृषी, खनिज आणि औद्योगिक वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Weather Alert: अनंत चतुर्दशीला ‘तुफानी’ पाऊस; विदर्भ, मराठवाड्यात सतर्कतेचा अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती?

कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

सरकारच्या नव्या प्लॅनमुळे उपराजधानी नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. हे जिल्हे एकमेकांशी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच गडचिरोलीतील कोनसारी, सूरजागड यांसारख्या दुर्गम भागात रस्ते पोहोचल्याने तेथील लोहखनिज आणि इतर उद्योगांना देखील चालना मिळेल. विशेष म्हणजे हे सर्व मार्ग विदर्भातील प्रमुख केंद्रांना समृद्धी महामार्गासोबत जोडण्याचे काम करतील. त्यामुळे पूर्व विदर्भाची थेट मुंबईसोबतची कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे.

प्रस्तावित महामार्ग

नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग

नागपूर – गोंदिया हा द्रुतगती महामार्ग 162 किमीचा असेल. नागपूरमधील गवसी मानपूर ते गोंदियातील सावरी दरम्यान 3+3 लेनचा हा महामार्ग असेल. यावर 9 इंटरचेंज असतील. त्यासाठी 1634 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे.

नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग हा 204 किमीचा असेल. वर्धा जिल्ह्यातील सेलडोह ते चंद्रपूरमधील नवेगाव मोरे (घाटकुळ) दरम्यान या महामार्गाचे काम होईल. 2+2 लेनच्या या महामार्गावर 7 इंटरचेंज असतील. यासाठी 2159 हेक्टर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. हा महामार्ग नागपूर आणि चंद्रपूरमधील 9 तालुक्यांना जोडेल.

भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग

भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग हा  94 किमी लांबीचा असेल. भंडारा जिल्ह्यातील बोरगाव ते चंद्रपूर जिल्ह्यांतील ऋणमोजन दरम्यान 3+3 लेनचा हा महामार्ग बांधण्यात येईल. महामार्गावर 6 इंटरचेंज असतील. 1185 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून हा महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोडेल.

दरम्यान, मोठ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र विशेष उद्देश वाहन अर्थात ‘एसपीव्ही'(Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात आले आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर