– पिसगाव येथील घटना.
गजानन आसुटकर मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून विद्यार्थी घेवुन येत असलेल्या ऑटो पिसगाव येथे पलटी झाल्याची घटना आज दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोज शुक्रवारला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली.यात एक 10 व्या वर्गातील विद्यार्थी जागीच ठार झाला तर तिन विद्यार्थी जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की..
अनिकेत श्रावण पिंपळशेंडे वय 16 वर्ष रा.केगाव (मार्डी) ता.मारेगाव असे ऑटो पलटी होऊन अपघात जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असुन अनिकेत हा राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे दहाव्या वर्गात शिकत होता.तो आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोज शुक्रवारला सकाळी विद्यार्थी राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे येत होता
मार्डी येथून विद्यार्थी घेवुन ऑटो मारेगावकडे येत होता.पण ऑटो पिसगाव जवळ येताच पांढरकवडा (लहान) येथून एक दुसरा ऑटो भरधाव वेगात येत होता. तर मार्डी कडून विद्यार्थी येऊन येत असलेल्या ऑटोचालकांने दोन ऑटोंची धडक टाळण्याकरिता ऑटो ब्रेक केल्याने अनिकेत हा विद्यार्थी बसून असलेल्या बाजूने ऑटो पलटी झाल्याने अनिकेत हा ऑटो खाली दबल्या गेला व काही फूट पुढे घासत गेला.
यामध्ये अनिकेतच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर सदर ऑटोतील इतर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.अपघाताची माहिती प्राप्त होताच पिसगाव येथील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना दिली व जखमी विद्यार्थ्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.