हातातोंडाशी आलेले पिकं उध्वस्त,शेतकरी हवालदिल
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी तालुक्यातील अर्धाअधिक भुभाग जंगलाने व्यापलेला असून रानटी जनावराचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.परंतु या जनावरांना जंगलात पुरेसा चारा पाणी मिळत नसाल्याने जंगलात न राहता शेतशिवरात ठाण मांडून राहने सुरू असल्याने असलेल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत.
सिंधी वाढोणा येथिल शेतकरी धनराज निखाडे सिंधी वाढोणा शिवारातील गट क्र ५७ मधील चार एकर शेतातील संपूर्ण कापूसपिक रानडुकरांने उध्वस्त केले आहे.बियाने,खत , फवारणी ,मजूर मशागत हा संपूर्ण खर्च करून आता हातातोंसी सुपूर्ण पिक एका रातून रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

खर्च व अपेक्षित उत्पन्न मिळून तीन चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निखाडे यांनी सांगितले आहे.तालुक्यात रोही,रानडुकर वानर मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत असून सर्वात जास्त नासाडी रानडुक्कर करतात . नुकसान टाळण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय शेतकरी करत आहेत.यामधे हजारो रुपये खर्ची घातले जाते परतु रानटी प्राणी जुमानत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
मार्की,जामणी इ. अनेक शिवारात रानडुकराने कपाशीचे पीक उध्दवस्त केले आहे.असंख्य कळप रात्रंदिवस शेतातून फिरत आहेत.मात्र वन विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही . हेलपाट मारून कागदपत्रांची जुळवाजुळव करून तक्रार केल्यास हेक्टरी दोन तीन हजार रुपयांची तुटपुंजी मदत माथी मारली जातअसल्याने तक्रारी करण्याचे सोडून दिल्याचे शेतकरी सांगतात .