रेती उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी घरकूल लाभार्थ्यांचे निवेदन
नाहीतर पंधरा हजार परत करण्याचा इशारा
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
झरी जामणी मोदी आवास योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले.रेती अभावी बांधकाम सुरु झाले नसल्यामुळे कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याची मागणी मार्की येथिल घरकुल लाभार्थ्यांनी प्रभारी तहसीलदार महेश रामंगुडे यांचे कडे रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेंतर्गत अनेकांना घरकुल मंजूर करण्यात आले.माननीय पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळ येथित कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा केले.बांधकाम सुरू करण्याचे हेतून जूने जिर्ण घर मोडून पाया खांद्याला सुरुवात केली.विटा सिंमेट,गिट्टी,सलाख इ .बांधकाम साहित्याचे गोळा केले आहे.
परंतु रेती मिळत नसल्याने बांधाकाम करावे तरी कसे ?असा प्रश्न पडला आहे.अनेकांनी आपले जुने घर मोडून उघड्यावरच संसार मांडला आहे.यातील सर्वच लाभार्थी शेतमजूर,अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहे.या उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत बांधकाम होणे गरजेचे आहे कारण नंतर शेतीचा हंगाम सुरू होतो.परंतु रेती मिळत नसल्याने कुणीच बांधकामांची सुरुवात केली नाही.
तरी प्रशासाने मागणीची दखल घेऊन शक्य तितक्या लवकर रेती उपलब्ध करून द्यावी.अन्यथा खात्यावर जमा केलेले पंदरा हजार रुपये परत करण्याचा इशारा मोरेश्वर थेरे,निलेश मिलमिले,प्रविण थेरे , अनिल आवारी,गजानन मिलमिले,अनिल देवाळकर संदिप थेरे, संतोष देवताळे,बाबाराव आवारी,भास्कर देवाळकर,दिवाकर बोबाटे इत्यादी घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे .
चौकट
“तालुक्याला पैनगंगा नदीपात्र लागून आहे पण एकही रेती घाट यावर्षी लिलाव झाला नाही.परिणामी रेती चे दर गगनाला भिडले आहेत.याचा फायदा घेत रेतीतस्कर रात्रीच्या अंधारात खराब रेती आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे विकत असून.मात्र महसुल विभाग जाणीव पूरक काना डोळा करत असल्याचाआरोप सर्वसामान्य जनतेतूनकेला जात आहे.ही महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना परवडणार नसून तीस चाळीस हजार रेतीसाठी खर्च करून एक लाख वीस हजार रुपयांत घर बांधणे कठीण झाले आहे.”