मुकूटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा

0
81

सरपंच व गावकरी यांची मागणी

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.या बाबतचे निवेदन रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी यांना देण्यात आले आहे.

मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनमध्ये पार पडलेल्या गतिशक्ती मल्टी मॉडल . कार्गो टर्मिनल च्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमा करीता आलेले रेल्वेचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी,नरेश लेकरिया यांना मुकूटबन  ग्रामपंचायत व गावकऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मुकूटबन नगरीतील सरपंच सौ.मीना जगदीश आरमुरवार, ग्रा.म सदस्य शंकर लाकडे, संजय परचाके,अर्चना चिंतावार,तंटामुक्ती अध्यक्ष बाळूभाऊ बरशेटीवार,रमेश उद्दकवार,अरुण चिंतावार,गणेश चिंतावार,चक्रधर तिर्थगिरीकर व ग्रामस्थच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मुकूटबन वरून जाणाऱ्या प्रत्येक साप्ताहिक एक्स्प्रेस संत्रा – गाच्छी (12 767 ) ‘ नांदेड दीक्षाभूमी एक्स्प्रेस (11045 )  पूर्णा पटना (17610 ).काझी पेठ दादर ( 07196 )  तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस चा थांबा मुकूटबनला देण्यात यावा तसेच रेल्वे तिकीट आरक्षण मुकूटबन रेल्वे स्टेशनला सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली   निवेदन देते वेळी मोठ्या  मुकूटबन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामवासी मोठया संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here