नवरगाव (धरण) येथील भव्य यात्रेला उद्या पासुन होणार सुरुवात

0
74

श्री.कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण येथे उद्या दुपारी 1 वाजता करण्यात येणार गोपाल काला

यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री कृष्ण तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक ८ मार्च २०२४ रोज गुरुवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली होती व उद्या दिनांक १४ मार्च २०२४ रोज गुरुवारला दुपारी १ वाजता गोपाल काला करण्यात येणार आहे.आणि १८ मार्च २०२४ रोज सोमवारला पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.

तसेच या यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले असुन या शंकरपटाचे उद्घाटन दि.१५ मार्च २०२४ रोज शुक्रवारला अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.तसेच भव्य यात्रेचे आयोजन पण करण्यात आले आहे. उद्या पासुन सुरु होणाऱ्या यात्रेचा परिसरातील भाविककान्हा आनंद घेता येणार आहे.श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए-३९२ द्वारा १४ ते १८ मार्च पर्यंत या भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी ] असुन असंख्य जुण्या दगडी कोरीव मुर्ती त्या मंदिरात आहे.त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर आहे.गावापासुन अंदाजे 1 कि.मी अंतरावर श्री.तुळशी वृंदावन देवस्थान आहे.या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन १९४९ साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जाते. ही मारेगाव तालुक्यातील श्री.ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते. देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह, बगीच्याचे कंम्पाऊंड, पुर्ण परीसर विद्युतीकरन, प्रशस्त निवास, परीसराला संरक्षण भिंत, ईत्यादी विकास कामे झाले आहे.

दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय, विश्राम गृहाचे पण काम झाले आहे.या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे उद्या पासुन भव्य जत्रा महोत्सव सुरू होत आहे.दिनांक १४ ते १८ मार्च पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन ८ मार्च रोजी घटस्थापना करण्यात आली होती व उद्या दिनांक १४ मार्च २०२४ रोज गुरुवारला दुपारी 1 वाजता गोपाल काला करण्यात येणार आहे व १८ मार्च रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती व्यवस्थापन कमेटी व आयोजन समिती श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान, नवरगांव (धरण) ता. मारेगांव जि. यवतमाळ र.नं. ए-३९२ यांचे कडून प्राप्त झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here