सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या केगाव (वेगाव)बिट मधील कक्ष क्रमांक C 55 B मधिल निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधपणे ट्रॅक्टर मध्ये रेती भरून जंगल मार्गाने वाहतूक करत असल्या माहिती सामुहिक गस्तिवर असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांचे पथकास आज दिनांक १ मे २०२४ रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास मिळताच त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे लगेच पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

असता ड्रायव्हर ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार होत असताना त्यांचे पथकाचे निदर्शनास आले असता पथकाने त्यांचा पाठलाग करून वेगाव येथे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ ए पी २५८८ ताब्यात घेवून मारेगाव येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात खुल्या जागेवर लावण्यात आला असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, क्षेत्र सहाय्यक दिनेश पोयाम, मोहन टोंगे, वनरक्षक मोनाली मडावी यांनी ही कारवाई केली.
जंगल क्षेत्रामध्ये विना परवाना कोन्हीही प्रवेश करु नये, जंगल क्षेत्रातील झांडांची तोड करु नये, जंगल क्षेत्रामध्ये आग लावु नये तसेच तेंदु पाने, मोह फुले वेचण्याकरिता एकटे जंगल क्षेत्रामध्ये जावु नये तसेच मानव वन्यजीव संघर्ष घडेल असे कुठलेही कृत्य करु नये.असे आवाहन शं. ग. हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) मारेगांव यांचेतर्फे मारेगांव वनरिक्षेत्रातील लोकांना आवाहन करण्यात आले आहे.