सेवानिवृत शिक्षक गावडे यांचा सत्कार
प्रा.गायकवाड यांचे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन
ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी
झरी जामणी:- तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मार्की येथे दि.३० रोजी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती,पालक व गावकरी यांनी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा देविदास गायकवाड तर प्रमुख म्हणून बंडू पारखी यांची उपस्थित होते.माननीय अध्यक्षांच्या हस्ते यावेळी वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून निरोप देण्यात आला.

शाळेत कार्यरत असलेले विषय शिक्षक एस.वाय.गावंडे हे सेवानिवृत्त होत आहे .त्यांचा शाल श्रीफळ व साडी देवून सहपत्नीक सत्कार करण्यात आला.या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्चपदावर व चांगाल्या हुद्द्यावर काम करत आहे.मेघनाथ नानाजी विधाते (स्टेट बँक ऑफ इंडिया ), मंगेश गजानन भट (मेट्रो ऑपरेटर पुणे ),प्रफुल पंढरी मोहितकर (आय टी इंजिनीयर पुणे ) किशोर बंडू गोरकार ,प्रफुल गायकवाड ,निलेश दिलिप पायघन ,संदीप कृ.पायघन यासारखे अनेक विद्यार्थ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक देविदास गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पोलचेट्टीवार,देविदास तुरणकर ,जीवन उलमाले , अजय गोहोकार,तात्याजी कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात सरपंची मारोती येडमे,तंटामुक्ती अध्यक्ष विलास गोहोकार,पोलीस पाटील सौ.धुर्वे ,गजानन बोधे,मेघा गोरोकार, सुष्मा बोधे,अल्काताई पायघण यांचे सह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते .