ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामनी
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी झरी तालुका पत्रकार संघटनेकडून कला गुणांना वाव मिळण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .ही नृत्य स्पर्धा झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल च्या प्रांगणात दिनांक १२ मे रोजी ७ वा सायंकाळी आयोजीत केलेली आहे.ही स्पर्धा १५ वर्षावरील वयोगटासाठी खुली आहे.
या स्पर्धेत पुरस्कार विजेत्या स्पर्धकांना रोख रकम, प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे, यात प्रथम बक्षीस नऊ हजार, दुसरे सात हजार,तिसरे पाच हजार,चौथे तीन हजार ‘ पाचवे दोन हजार व सहावे.एक हजार रुपयांचे रोख रकमेचे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
सर्वच स्पर्धकांना मानचिन्ह भेट देण्यात येणार आहे.या स्पधेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय निंदेकर,उपाध्यक्ष बंडुभाऊ सोयाम,सचिव झानेश्वर आवारी ‘ व सर्व सदस्या कडून करण्यात येत आहे.अधिक माहिती करिता , 8805979173 या क्रमांकावर संपर्क करण्याचे कळवीले आहे .