सुशिक्षित बेरोजगारांचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
सुरेश पाचभाई मारेगाव,
कंत्राटी शिक्षण सेवक भरती सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य द्या अशा प्रकारचे निवेदन तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी गटशिक्षणाधिकारी मारेगाव यांना दिले आहे.
पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेले रिक्त पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.यात सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचे नमूद आहे. सध्या सगळीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.शिक्षण पदविका घेतलेले बी.ए.,एम.ए.आणि बी.एड.,डी.एड. झालेले अनेक विद्यार्थी अनेक गावांमध्ये आहेत.
त्यांना वाऱ्यावर सोडून निवृत्त शिक्षकांना घेण्याचे पत्र प्रसिद्ध झाल्याने अनेकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना वंचित ठेवण्यात येऊ नये.तसेच ही भरती प्रक्रिया शाळा तसेच ग्रामपंचायत स्तरावर न घेता पंचायत समिती स्तरावर घ्यावी जेणेकरून प्राधान्य क्रम देताना योग्य व्यक्तीला न्याय मिळेल अशी अपेक्षा सुद्धा या सुशिक्षित बेरोजगारांनी व्यक्त केलेली आहे.
मागच्या वर्षी जे कंत्राटी शिक्षण सेवक होते त्यांनाच पुन्हा संधी न देता ही प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी अशी सुद्धा या निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे.यावेळी आशिष भास्कर पिंपळकर,सुधीर रमेश कळसकर,गजानन लक्ष्मण झाडे,अजय निळकंठ पाल,निखिल अरुण गेडाम,विनोद वसंता वासाडे आणि पवन भास्कर भोयर उपस्थित होते.