आरोपी प्रियकराविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सुरेश पाचभाई मारेगाव,
प्रेमाच्या आणाभाका एकीसोबत आणि लग्न दुसरीसोबत लावणाऱ्या प्रियकराविरोधात अखेर फसवणूक झालेल्या प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली.सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका गावातील असून या घटनेने प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे.
तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचे रवी महादेव मेश्राम वय अंदाजे 24 वर्ष या युवकाशी सूत जुळले.सन 2022 जुळलेले यांचे प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले.भेटी गाठी वाढल्या.अशातच दि.17/12/2023 ला आरोपीने या अल्पवयीन मुलीशी आपण लग्न करणार आहोत असे आमिष देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला.तुला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच लग्न करणार असे खोटे आश्वासन देत होता व वारंवार लैंगिक शोषण करीत होता.
त्या मुळे अल्पवयीन मुलीगी ही 8 महिन्यांची गरोदर राहिली तिने 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीने त्या मुलाला माझ्यासोबत लग्न कधी करणार आहे असे विचारले असता आता माझे लग्न झाले आहे मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे उत्तर दिले.आरोपी प्रियकराने 25/4/2024 ला दुसऱ्या मुलीशी लग्न केले.या घटनेची माहिती मिळताच मुलीला धक्काच बसला.सन 2022 पासून जपलेले प्रेम एकाएकी तुटून पडले.
घेतलेल्या आणाभाका हवेतच विरून गेल्या होत्या.आता काय करावे या विमनस्क अवस्थेत असलेल्या प्रेयसीने अखेर प्रियकराविरुद्ध आपल्या वडिलांसोबत मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
यावरून मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम 376(2)(n), सह कलम 3(A) बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक कलम 4,5,6 नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.डॉ.ज्ञानेश्वर सावंत, शंकर बारेकर करीत आहे.