शेतकरी न्याय यात्रचे आयोजन

0
106

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

झरी जामनी:- वणी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी न्याय यात्रेचा आयोजन आशिषभाऊ खुलसंगे यांनी केले असून या शेतकरी न्याय यात्रेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन ९ ऑगस्ट पासून २२ ऑगस्ट करण्यात आले असून या यात्रेची सुरुवात मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथुन सुरुवात होणार असून मारेगाव तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये शेतकरी शेतमजूर यांना भेट देऊन त्यांच्या मागण्या उनिवा समजून घेण्याचं कार्य शेतकरी आयोजन समितीचे अध्यक्ष आशिषभाऊ खुलसंगे करणार आहे.

त्यानंतर झरी जामणी तालुक्यातील झमकोला येथील शिवमंदिर येथून सुरुवात करून झरी तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवकांची या यात्रेमध्ये आपल्या गावातील समस्येबाबत शेतकरी न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे ” मागिल दहा वर्षापासून सरकारच्या विचारहीन धोरणामुळे संपूर्ण जनता त्रस्त झाली आहे.

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतमालाला भाव नाही. यामुळे सेतकरी हवालदिल झाला आहे.महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. वणी विधानसभा क्षेत्र खनिज संपती आहे मात्र,आमदार यांचे ढिसाळ नियोजन नाकर्तेपणामुळे परिसरातील नागरिकांना विकाशापासून वंचित रहावे लागत आहे जनतेला न्याय देण्याकरिता शेतकरी न्याय यात्राचे आयोजन केले आहे.

आपण सर्व शेतकरी,शेतमजूर युवकांनी या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावे व आपल्या न्याय हक्कासाठी आवाहन करण्यात आले आहे.स्वामीनाथम आयोग लागू करावा.शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव मिळावा.सरसकट व १००/ शेतकरी कर्जमाफी करावी (तैलंगणा राज्याच्या धर्तीवर कृषी उपयोगी शेती अवजारावरील जि.एस.टी.पूर्ण पणे रद्द करावी.६० वर्षा वरील शेतकऱ्यांना प्रती महिना १०००० रु.देण्यात यावे.जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,कापसाला १२०००रु. प्रती क्विंटल,तुरीला १५००० रु. प्रती क्विंटल तर सोयाबील ता ८००० रु. प्रती क्विंटल भाव देण्यात यावा.

वणी विधानसभा क्षेत्रातील पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकयांना न्याय मिळावा,दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत जाहीर करावी,कृषी पंपाचे विज संपूर्णतः कर्ज माफ करण्यात यावे शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा पुरवण्यात यावा,वणी विधानसभा क्षेत्रामध्ये,वन्य प्राण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान बधता शेतकऱ्यांना काटेरी तार कंपाउंड १००% सब्सिडीमध्ये देण्यात यावे. झरी मारेगाव व वणी तालुक्यात ओ.बी.सी. मुला-मुलीसाठी शासकीय वसतिगृह सुरु करावे.

वणी विधानसभा क्षेत्रामधी सर्व कंपनीमध्ये नोकरीसाठी ८०% स्थानिक युवक – युवतीना प्राध्यान मिळावे झरी व मारेगाव येथे तात्काळ बस स्थानक सुरु करावे व झरी व मारेगांव तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम त्वरित सुरु करावे.मारेगाव एम.आय.डी.सिचा प्रश्न तातडीने सोडवावा.वणी विधानसभा क्षेत्रात मिळणाऱ्या खनिजामुळे दिला जाणारा खनिज विकास निधी पूर्ण जिल्हाकरिता न वापरता, केवळ वणी विधानसभा क्षेत्राकरिता वापरन्यात यावा असे पत्रकार परिषदेमध्ये आशिष भाऊ खूलसंगे यांनी माहिती दिली असून सदर निधी हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये वापरल्या जात आहे.

तेव्हा सदर निधी हा फक्त वणी विधानसभा क्षेत्र वापरण्यात यावा असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे. झरी व मरेगाव वणी क्षेत्रामध्ये ९ ऑगस्ट पासून २२ तारखेपर्यंत वणी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २२ तारखेला या शेतकरी न्याय यात्रेचे वसंत जिनिंग वणी येथे सांगता होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूभाऊ कासावार,राजूभाऊ एलटीवार,झरी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुरेंद्र गेडाम,भूमारेड्डी बाजनलवार,भूमारेड्डी येनपोतुलवार व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here