तहसील कार्यालयासमोर सुरू केले उपोषण
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव येथील मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बस स्थानकाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी माकपतर्फे पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. हे उपोषण मारेगाव तहसील कार्यासमोर करण्यात येत आहे.
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.येथे मागील अनेक वर्षांपासून बसस्थानक नाही. बस स्थानक निर्माण व्हावे त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.परंतु अजूनही बस स्थानकाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. उन्हाळा, पावसाळा या दोन ऋतूंमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.प्रवाशांना या त्या दुकानांचा आडोसा घेऊन किंवा कधी झाडाच्या सावलीखाली उभे राहावे लागते.

अशी अवस्था असताना सुद्धा बस स्थानकाचे काम करण्यात आले नाही.म्हणून भाकपतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे.त्यांनी मारेगाव बस स्थानकाचे बांधकाम त्वरित सुरू करावे,तसेच बांधकाम निधी शासनास केव्हा प्राप्त झाला,मग एक वर्षांमध्ये काम का झाले नाही?या कामाचे इस्टिमेट,नकाशा, टेंडर पत्र,काम कोणी घेतले आणि हे बांधकाम केव्हा सुरू होणार या सर्व बाबींची लेखी पूर्तता करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

मारेगाव बस स्थानकाच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अनेकदा आंदोलने केल्या गेली.त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना आश्वासनावर आजपर्यंत बोळवन केल्या गेली.परंतु जोपर्यंत आता लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपले आमरण उपोषण थांबणार नाही अशा प्रकारचा इशारा भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे देण्यात आलेला आहे.यावेळी उपोषणाला भाकपचे जिल्हाध्यक्ष बंडू गोलर यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा बसलेले आहे.